मुंबई: ‘बिग बॉस मराठी 6’ची विजेती तन्वी कोलते सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणा आणि दमदार खेळीमुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तन्वीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका सोडण्यामागचं कारण उघड केलं आहे.
तन्वीने सांगितलं की, मालिकेमधील तिच्या भूमिकेला अपेक्षित तितका वाव मिळत नव्हता. तिच्या व्यक्तिरेखेचा स्क्रीनटाइम कमी होत चालल्यामुळे पुढील वाटचालीबाबत ती विचार करत होती. याच दरम्यान तिला ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.या निर्णयाबद्दल बोलताना तन्वी म्हणाली की, हा निर्णय घेणं सोपं नव्हतं, मात्र कलाकार म्हणून योग्य दिशा निवडणं गरजेचं होतं. टीमसोबत चर्चा करूनच तिनं हा निर्णय घेतला.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून ओळख असलेल्या तन्वीने ‘लक्ष्मी निवास’मधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मध्ये तिचा आत्मविश्वासपूर्ण आणि बिनधास्त खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळाला. टास्कमधील सक्रिय सहभाग आणि स्पष्ट भूमिका यामुळे ती संपूर्ण सीझनभर चर्चेत राहिली.दरम्यान, ‘बिग बॉस मराठी 6’मधील तिचा प्रवास हा सातत्य, प्रामाणिकपणा आणि धाडसी निर्णयांचं उत्तम उदाहरण मानला जात आहे.