सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी, भारताकडे येणारं जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत जप्त, IRGC ची कारवाई, जहाज इराणकडे घेऊन गेले
  • राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
  • मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
  • महिला आरक्षण विधेयक 2029 मध्ये लागू होईल, महिलाच विरोधकांना वठणीवर आणतील, जनमताच्या रेट्याने विरोधकांचे चेहरे उघडे पाडू : देवेंद्र फडणवीस
 जिल्हा

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; 2.57 मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डिजिटल पुणे    22-04-2026 15:07:59

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर ग्रीड सोलर ऊर्जा प्रणालीद्वारे वीज निर्मिती करून तीच ऊर्जा वापरण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹13.03 कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून, यामुळे एसटीच्या ऊर्जावापरात मोठी बचत होऊन पर्यावरणपूरक पाऊल उचलले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या बसस्थानके, कार्यशाळा, कार्यालये आणि इतर आस्थापनांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढणार असून, दरवर्षी सुमारे 3 ते 4 कोटी रुपयांचा पारंपरिक वीज खर्च वाचणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करताना नमुना नकाशे, तांत्रिक मान्यता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हा उपक्रम हरित ऊर्जा वापराच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यामुळे ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि आर्थिक शिस्त या तिन्ही बाबींमध्ये सकारात्मक परिणाम अपेक्षित असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती