नऱ्हे गावात पावसाळ्यापूर्वीची गंभीर समस्या!
प्रभाग क्रमांक ३४ मधील नऱ्हे गाव येथे ओढे, नाले आणि कलवर्ट परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. यामुळे पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असून, येणाऱ्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे.
ही परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे.
याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोरराम साहेब यांना प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, यासाठी आदरणीय बाळासाहेबजी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन सादर करण्यात आले.