सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 जिल्हा

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय सन्मान

डिजिटल पुणे    24-04-2026 11:00:41

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सोहळ्यात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी भा.प्र.से. यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने हा गौरव सोहळा पार पडणार आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत नागरिकांना वेळेत व पारदर्शक सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी भा.प्र.से. यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कार्यकाळात विविध सेवांबाबत आलेल्या अर्जांचा वेगाने आणि प्रभावीपणे निपटारा करण्यात आला असून, प्रशासनातील कार्यक्षमतेचा आदर्श त्यांनी राज्यासमोर ठेवला आहे.

विशेष म्हणजे, दिलीप स्वामी भा.प्र.से. यांनी १०० दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित प्रकरणांचा यशस्वी निपटारा करून सेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे नागरिकांना त्वरित सेवा मिळण्यास मोठी मदत झाली असून, प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

हा सन्मान सोहळा मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सोहळ्यात राज्यभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येणार असून, त्यामध्ये दिलीप स्वामी भा.प्र.से. यांचा समावेश ही छत्रपती संभाजीनगरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.दिलीप स्वामी भा.प्र.से. यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यातून इतर अधिकाऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.


 Give Feedback



 जाहिराती