सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 जिल्हा

‘महानीती’ प्लॅटफॉर्मचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

डिजिटल पुणे    24-04-2026 16:09:35

मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला १ ट्रिलियन डॉलरच्या दिशेने वेग देण्यासाठी मित्रा यांच्या वतीने ‘महानीती’ ही एकात्मिक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.या प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मित्रा (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, बीआयएसएजी-एन चे महासंचालक डॉ. टी. पी. सिंह, मित्राचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विराज लोलियाना, संशोधन अधिकारी सुमेरन बालसेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.ही प्रणाली ‘मुख्यमंत्री गती शक्ती’ या संकल्पनेवर आधारित असून याअंतर्गत नैसर्गिक साधनसंपत्ती व विविध मालमत्तांची सर्वसमावेशक माहिती प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. तसेच विविध प्रकल्पांचे नियोजन, अंमलबजावणी आणि निरीक्षणासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती