सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 जिल्हा

उरणची वीज यंत्रणा ऍक्शन मोडवर ;पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    27-04-2026 12:27:05

उरण : पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी उरण महावितरणतर्फे मान्सूनपूर्व देखभाल मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत १० विभागांतील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.सध्याही अनेक कामे महावितरण विभागाने हाती घेतले आहेत.पावसाळा पूर्वी सर्व कामे करणे हे त्यांचे लक्ष आहे.
 
उपअभियंता विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. तसेच जीटीपीएस सब-स्टेशन ब्रेकर दुरुस्ती, मुख्य वीजवाहिन्यांतील सैल कनेक्शनची तपासणी व दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर देखभाल आदी कामे करण्यात आली.
 
धोकादायक वीज खांब बदलण्यासाठी सर्वेक्षणही करण्यात आले. करंजा, मोरा आणि चिरनेर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली असून उर्वरित भागांत . टप्प्याटप्प्याने कामे केली जाणार आहेत.
नागरिकांना पूर्वसूचना देऊन वारंवार माहिती दिली जात आहे.ज्या भागांत कामे होणार आहेत, तेथील नागरिकांना मोबाइल ऍपद्वारे पूर्वसूचना दिली जात आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.पावसाळा पूर्वीची कामे प्रगतीपथावर असून उरणची वीज यंत्रणा आता ऍक्शन मोडवर दिसत आहे.


 Give Feedback



 जाहिराती