सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 DIGITAL PUNE NEWS

रितेश देशमुखचा दिग्दर्शक बनण्यामागचा प्रवास; वडिलांचा सल्ला आणि जिनिलीयाची साथ ठरली निर्णायक

डिजिटल पुणे    27-04-2026 14:44:49

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखने मराठी चित्रपट *‘वेड’*च्या माध्यमातून दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. आता तो आगामी ‘राजा शिवाजी’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आहे. या चित्रपटात तो केवळ दिग्दर्शकच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारत आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रितेशनं दिग्दर्शन करण्यामागचं कारण आणि त्यामागचा प्रवास उलगडला. सुरुवातीला तो आर्किटेक्ट म्हणून काम करत होता आणि स्वतःची फर्मही चालवत होता. सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेताना त्यानं वडील आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी चर्चा केली होती.

रितेशनं सांगितलं की, “मी त्यांना सांगितलं की मी अभिनय करणार आहे. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं तुझं आयुष्य आहे, तू निर्णय घे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची घेतो.” वडिलांच्या या शब्दांनी त्याला आयुष्यात मोठा धडा दिला, असं तो म्हणाला.

दिग्दर्शक म्हणून काम करताना त्याला प्रचंड दडपण जाणवलं, हेही त्यानं मान्य केलं. “इतकी वर्षं अभिनेता म्हणून काम केल्यानंतर अचानक दिग्दर्शन करणार म्हटलं की लोकांच्या अपेक्षा आणि शंका दोन्ही असतात. ‘हा काय करणार?’ असे प्रश्न उपस्थित होतात,” असं तो म्हणाला.

यावेळी पत्नी जिनिलिया देशमुखची साथ त्याच्यासाठी महत्त्वाची ठरली. “जास्तीत जास्त काय होईल? चित्रपट चांगला नाही झाला, तरी आपण प्रयत्न तर केला असेल,” असा सकारात्मक दृष्टिकोन जिनिलियाने दिल्याचं रितेशनं सांगितलं. याच धैर्यामुळे ‘वेड’ साकार झाला, असं तो म्हणाला.आता ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या असून, रितेशचा हा नवा प्रवास किती यशस्वी ठरतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती