सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 DIGITAL PUNE NEWS

बाळाच्या आगमनाआधीच नावांवर चर्चा; दिव्यांका-विवेकची मजेशीर प्लॅनिंग

डिजिटल पुणे    27-04-2026 14:55:33

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. ती आणि तिचा पती विवेक दहिया लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. अलीकडेच झालेल्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.दिव्यांका नियमितपणे चाहत्यांसोबत गरोदरपणातील अपडेट्स शेअर करत असते. दरम्यान, विवेकने शेअर केलेल्या एका व्लॉगमध्ये दोघांमध्ये बाळाच्या नावांवर मजेशीर चर्चा रंगलेली दिसते. घरात नवीन सदस्य येणार असल्याने दोघांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद स्पष्टपणे झळकत आहे.

व्लॉगमध्ये विवेकने ‘जोई’ हे नाव पसंत असल्याचं सांगितलं, मात्र दिव्यांकाला ते नाव फारसं आवडलं नाही. तिने मुलगी झाली तर ‘कहकशा’ या वेगळ्या नावाचा विचार करता येईल, असं सुचवलं. तसेच विवेकने ‘कीशा’ हे नावही सुचवलं, पण त्यावर दोघेही अजून ठाम नाहीत.

मुलासाठी ‘रुद्राक्ष’ हे नाव दिव्यांकाला आवडत असलं तरी त्यामागील अर्थ लक्षात घेता ती थोडी साशंक आहे. त्यामुळे सध्या तरी या स्टार कपलकडून नाव निश्चित झालेलं नसून, चाहत्यांमध्येही या चर्चेची उत्सुकता वाढली आहे.


 Give Feedback



 जाहिराती