सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 जिल्हा

पॉश कायद्याच्या नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई — आयुक्त जगदीश मिनियार

डिजिटल पुणे    28-04-2026 17:54:10

मुंबई : महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच पुनरावृत्ती झाल्यास दंड वाढविणे, परवाना रद्द करणे यासारखी कडक कारवाईही करण्यात येईल, अशी माहिती महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ (पॉश ॲक्ट) याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या सर्व कार्यालये, संस्था, संघटना, महामंडळे तसेच खासगी उद्योग, शैक्षणिक संस्था, आरोग्य सेवा, क्रीडा संस्था, सेवा पुरवठादार आदी सर्व आस्थापनांनी अंतर्गत समिती स्थापन करणे आवश्यक आहे.

खासगी आस्थापनांनी केंद्र शासनाच्या SHE Box Portal (https://shebox.wcd.gov.in) वर नोंदणी करून त्यांच्या अंतर्गत समितीची माहिती ऑनलाईन अपलोड करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.नोंदणीसाठी अधिकृत ई-मेल आयडी आवश्यक असून, तांत्रिक अडचणी आल्यास ‘Forgot Password’ पर्यायाचा वापर करता येतो. तसेच नागरिकांना, विशेषतः महिलांना आवाहन करण्यात आले आहे की, ज्या कार्यालयांमध्ये अंतर्गत समितीबाबत माहिती दर्शविणारा फलक नसल्यास १८१ या टोल-फ्री हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी किंवा SHE Box Portal वर ऑनलाईन तक्रार करावी.महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी राज्यातील सर्व आस्थापनांनी पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती