छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना श्री. दिलीप स्वामी भा.प्र.से. यांनी आपल्या कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात आदर्श कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यकाळात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत प्रशासन अधिक गतिमान व उत्तरदायी बनले.
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत नागरिकांना वेळेत सेवा मिळावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करून १०० दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेली अनेक प्रकरणे मार्गी लावण्यात आली. यामुळे नागरिकांना त्वरित सेवा मिळाली असून प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
दिलीप स्वामी भा.प्र.से. यांनी तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करत सामान्य नागरिकांच्या अडचणींना प्राधान्याने प्रतिसाद दिला. तसेच डिजिटल पद्धतींचा अवलंब करून कामकाज अधिक पारदर्शक व सुलभ केले.
विविध विभागांमध्ये समन्वय साधत विकासकामांना गती देण्यात आली असून, प्रशासनात जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. त्यांच्या कार्यशैलीमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान, त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मा. राजेश अग्रवाल भा.प्र.से. यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन दिलीप स्वामी भा.प्र.से. यांचा गौरव करण्यात आला.दिलीप स्वामी भा.प्र.से. यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यातून इतर अधिकाऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.