सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 जिल्हा

मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीत उलटफेर; संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव, स्वरूपानंद देशमुख विजयी

डिजिटल पुणे    29-04-2026 11:13:28

बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी झालेल्या या निवडणुकीत त्यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे.या निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांनी आश्विनी देशमुख यांच्यावर मात करत विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी आघाडी घेत सरपंचपद पटकावले.

28 एप्रिल रोजी पार पडलेल्या मतदानात गावातील एकूण 2,084 मतदारांपैकी 1,744 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सुमारे 84 टक्के इतक्या उच्च मतदानामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.आज तहसील कार्यालयात सकाळपासून मतमोजणी सुरू झाली आणि अखेर निकाल जाहीर झाला. या निकालाने गावाच्या राजकारणात नवा कलाटणी मिळाल्याचे मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती