सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 जिल्हा

राष्ट्रीय कार्यक्रमात, स्व-गणनेत सामील व्हा- पालकमंत्री डॉ. उदय सामंत

डिजिटल पुणे    02-05-2026 14:35:11

रत्नागिरी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी स्व-गणना करत जनगणना 2027 चा आरंभ आज पोलीस परेड ग्राऊंड येथे केला. राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून रत्नागिरी जिल्हावासियांनी जनगणनेत सामील व्हावे, स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

पोलीस परेड ग्राऊंड येथील ध्वजवंदन कार्यक्रमानंतर पालकमंत्री जनगणना सेल्फी पॉईंट येथे येऊन त्यांनी स्व-गणना केली. यानंतर त्यांनी जिल्हावासियांना आवाहन केले. ते म्हणाले, मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्व रत्नागिरीकरांना आवाहन करायचे आहे, स्व-गणना आज 1 मे पासून 15 मे पर्यंत पूर्ण देशामध्ये होतेय. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील लोकांनी देखील सामील झालं पाहिजे. केंद्र सरकारने विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2011 नंतर ही जनगणना आता पहिल्यांदा होत आहे. त्यामध्ये एक राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून आपण सर्वांनी सामील व्हावं, ही पालकमंत्री म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करतो.

यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके आदी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती