सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 जिल्हा

स्वगणना करीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा जनगणनेचा शुभारंभ

डिजिटल पुणे    02-05-2026 14:39:44

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय जनगणनेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.कणकवली येथील पालकमंत्री यांच्या निवासस्थानी या शुभारंभ कार्यक्रमासाठी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी टॅब वर स्वतःच्या घर गणनेसंबधी असणाऱ्या सर्व ३४ प्रश्नांची उत्तरे स्वतःच भरली. त्यानंतर स्वतःच्या घराची माहिती भरल्यानंतर submit बटन क्लिक केल्यानंतर त्यांचा self enumeration ID तयार झाला. अशा पद्धतीने स्वतःच स्वतःची माहिती भरून पालकमंत्री महोदय यांनी जिल्ह्यातील जनतेला स्वगणना करण्याचे आवाहन देखील केले.दिनांक १ ते १५ मे हा स्वगणनेचा कालावधी असून त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत घरोघरी जाऊन प्रगणकांमार्फत जनगणना केली जाणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती