सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
  • बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
 शहर

आझम कॅम्पसच्या शाळांचे १२ वी च्या परिक्षेत घवघवीत यश

डिजिटल पुणे    02-05-2026 16:20:58

पुणे :   महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल  अँड  आबेदा इनामदार  ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स ' ,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ,एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड  ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी  बारावी  परिक्षेत यश मिळवले. संस्थेच्या  अध्यक्ष  आबेदा इनामदार ,सचिव प्रा. इरफान शेख,मुख्याध्यापक  राज मुजावर,प्राचार्या  सौ.रोशन आरा शेख,मुख्याध्यापिका  असफिया अन्सारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन  केले.

अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल ९३.८१ टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ९८.४४ टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ५० टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९४.९० टक्के इतका लागला. विज्ञान शाखेतून ७४.१७ टक्के गुण मिळवून शेख उझमा रफीकअहमद ही विद्यार्थीनी प्रथम आली . कला विभागात सय्यद अयमन मुजीब ही विद्यार्थीनी ५५.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली तर कॉमर्स विभागात शेख मोहम्मद अब्दुर रेहमान खालीद रीझवान हा विद्यार्थी  ८५ टक्के गुण मिळवून प्रथम आला.

आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स, पुणे चा एकूण निकाल ९६.१३  टक्के लागला. एकूण ५१ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९६.३५ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९७.२० टक्के,कला शाखेचा निकाल ८९.३३  टक्के निकाल लागला तर एच एस व्ही सी शाखेचा निकाल ९६.८७ टक्के लागला.कु. बरीरा हुसेन नदाफ ही विद्यार्थीनी ८५.८३ टक्के गुण मिळवून कला शाखेत  प्रथम आली .वाणिज्य विभागात कु.सारा अलीम शेख ही ८९.१७ टक्के मिळवून प्रथम आली व कॉलेज मध्ये प्रथम  आली.कु. सबेरा शमशेर पठाण ही ८४.३३  टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली. तर कु. तहरीम फातिमा वसीम शेख ही व्होकेशनल - एच एस व्ही सी  शाखेत ८६.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली . 

एम.सी.इ.एस. इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेज' चा निकाल ९१.१२ टक्के लागला.विज्ञान शाखेचा निकाल ९३.६० टक्के इतका लागला. कला शाखेचा निकाल ८० टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९०.०७ टक्के इतका लागला.  फरहान हसनैन अन्सारी हा ७४.६७ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात  महम्मद मुआझ नूर अहमद काझी हा ८२.३३ टक्के मिळवून प्रथम आला तर रिम समीर खान ही  विद्यार्थिनी ८७ टक्के  गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.

 


 Give Feedback



 जाहिराती