सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 DIGITAL PUNE NEWS

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार

डिजिटल पुणे    04-05-2026 11:51:01

मुंबई :रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी हा ऐतिहासिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, केवळ तीन दिवसांतच चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. हिंदीसोबतच मराठी प्रेक्षकांमध्येही ‘राजा शिवाजी’ची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11.35 कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10.55 कोटींचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी कमाईत आणखी वाढ होत 12 कोटींचा आकडा पार केला. अशाप्रकारे, केवळ तीन दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई सुमारे 33.90 कोटींवर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, या कमाईत मराठी व्हर्जनचा मोठा वाटा आहे. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये ‘राजा शिवाजी’ने आपले स्थान पटकावले आहे.दरम्यान, साई पल्लवी आणि जुनैद खान अभिनीत स्पर्धात्मक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी छाप पाडू शकलेला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीचा अभिमान मांडणारा ठरत आहे. राज्यभरातून तसेच बाहेरील प्रेक्षकही मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे आकर्षित होत असून, कुटुंबासह चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल दिसत आहे.


 Give Feedback



 जाहिराती