सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 DIGITAL PUNE NEWS

‘आई तारी तिला कोण मारी’; ‘मर्दिनी’च्या पोस्टरमधून आईच्या सामर्थ्याची झलक, 3 जुलैला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार

डिजिटल पुणे    04-05-2026 15:47:59

मुंबई: आशयप्रधान आणि सामाजिक विषयांना हात घालणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत आता ‘मर्दिनी’ या नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं अधिकृत पोस्टर लॉन्च करण्यात आलं असून, त्यातून प्रेक्षकांसमोर एक प्रभावी आणि भावनिक कथा उलगडण्याची चाहूल लागली आहे. पोस्टरवरील “आई तारी तिला कोण मारी” हे कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत असून, आईच्या सामर्थ्यवान रूपाची झलक त्यातून दिसून येते.

श्रेयस तळपदे प्रस्तुत ‘मर्दिनी’ हा चित्रपट केवळ स्त्रीशक्तीवर आधारित नसून, एका आईच्या संघर्षमय प्रवासाभोवती फिरणारी कथा आहे. आपल्या लेकरांसाठी आई कितीही कठीण परिस्थितीला सामोरी जाते आणि वेळ पडल्यास ती कठोर रूप धारण करते, ही संकल्पना या चित्रपटातून मांडली जाणार आहे. त्यामुळे हा चित्रपट भावनिक आणि प्रेरणादायी ठरण्याची शक्यता आहे.

या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी आणि राजेश भोसले यांसारखे दमदार कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. तसेच बालकलाकार मायरा वैकुळ हिची भूमिकाही कथेला वेगळं भावनिक वजन देणार आहे.

अजय मयेकर यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेला ‘मर्दिनी’ हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शकीय चित्रपट आहे. दिप्ती तळपदे निर्मित या चित्रपटात टिना राकेश कोठारी सहनिर्माती म्हणून सहभागी आहेत. छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक आणि पटकथा-संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजूची जबाबदारी सांभाळली आहे.पोस्टरमधून मिळालेल्या पहिल्या झलकमुळे ‘मर्दिनी’बद्दल चित्रपटवर्तुळात उत्सुकता वाढली असून, आईच्या प्रेम, संरक्षण आणि संघर्षाची ही कथा 3 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती