सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 जिल्हा

नसरापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग सक्रिय ;कठोर शिक्षेसाठी विशेष सरकारी वकील नियुक्तीची शिफारस

डिजिटल पुणे    04-05-2026 16:10:22

मुंबई : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट यांनी आज सकाळी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिचे पालक व नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या वतीने कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग सक्रिय झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच आयोगाने पोलीस प्रशासनाकडून तपशील मागवून चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान, पुणे-बेंगलोर महामार्गावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या वेळीही आयोगाची उपस्थिती होती.

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच न्याय मिळेपर्यंत आयोग पीडित कुटुंबासोबत ठामपणे उभा राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती