सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
  • नरसापूर अत्याचार प्रकरणावर संताप उसळला; अभिनेता प्रवीण तरडे यांची कठोर भूमिका, सरकारला थेट इशारा
  • रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ची बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई; 3 दिवसांत 30 कोटींचा टप्पा पार
  • नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन, “योगी सरकारसारखा कठोर निर्णय घ्या”
  • मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
  • बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार आघाडीवर; निकालादरम्यान भावूक प्रतिक्रिया, जल्लोष टाळण्याचे आवाहन
 जिल्हा

MMRDA नवनगर तीसरी मुंबई शेतकऱ्यांच्या साठी शाप की ऊशाप; शेतकऱ्यांचा तिसऱ्या मुंबईला विरोध

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    05-05-2026 17:06:35

उरण : शासनाच्या विविध धोरणामुळे व भू (जमीन) संपादन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून कोणत्याही प्रकल्प किंवा शासनाच्या निर्णयात शेतकऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडुन होत आहे.

महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्ह्यातील पेण पनवेल उरण या तीन तालुक्यातील १२४ गावात तिसरी मुंबई नवनगर प्रकल्प बसविण्या ची अती घाईने अधिसूचना २०२४ मध्ये जारी केली होती त्या प्रकल्पा ला १२४ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत त्यांच्या हरकती मागविल्या होत्या त्या प्रमाणे शेतकऱ्यांनी वेळेत १९००० हून अधिक शेतकऱ्यांनी हरकती घेतल्या होत्या त्यावर सुनावणी न घेता पुढील कारवाई रेटून दिनाक १६/४/२०२६ रोजी आदेश देऊन दिनांक २७/४/२०२६ रोजी ऑन लाईन भूसंपादन करण्यास सुरूवात केली आहे पण  १२४ गावातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता १९००० शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकती वर सुनावणी न घेता शेतकऱ्यां च्या भावना , मागण्या विचारात न घेता हा प्रकल्प लादला जात आहे त्याचा समर्थन करणाऱ्यांना लाज कशी वाटत नाही अशी संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

सदरच्या प्रकल्पात शेतकऱ्यांची पिढ्या न पिढ्या वडील, आजोबा पणजोबा नी राखून ठेवलेल्या जमिनी  इतक्या सोप्या पद्धतीने कश्या देतील. आज १२४ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीत लाखो राहाती घर आहेत त्याच जमिनीत शेतकऱ्यांचे कुटुंब रोजी रोजगार निर्माण करून अनेक शेती सह धंदे करून पोटभर अन्न खाऊन जगत आहेत त्यांना सरकारने काढलेल्या आदेशाने स्वतःच्या नावे मालक असलेल्या जमिनी देऊन बाहेर काढले जात आहे हे इतके सोपे आहे का ? दिनाक १६/४/२०२६ रोजी जे शासन निर्णया मध्ये जे कायदे दाखवून जमिनी संपादित करण्यासाठी अध्यादेश जारी केले आहेत ते १२४ गावातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत त्याला शेतकरी बळी पडणार असे जर शासनाला वाटत असेल तर त्या शासनाची घोर चूक आहे. पहिले मुंबई त्या नंतर नवी मुंबई, त्या नंतर पनवेल उरण येथील सिडको या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांची झालेली फसवणूक लक्षात घेता आता MMRDA नवनगर तीसरी मुंबई परिसरातील शेतकरी आता जागृत झाला आहे .

सरकार च्या २२, ५%भूखंड FSI आणि TPR आणि रेडिनेकर प्रमाणे मोबदला या धोरणाला शेतकरी बळी पडणार नाही.शेतकऱ्यांची जमीन सरकार कवडी मोल लाखात घेणार आणि ती शेती विकासाच्या नावावर परकीय गुंतवणूक करणाऱ्यांना देणार आणि परकीय लोक कोटी च्या भावत विकणार आणि परकीय लोक त्या शेतीच्या मध्ये गडगंज श्रीमंत होणार आणि शेतकरी देशोधडीला लागणार हे मनसुबे शासनाचे आहेत ते आम्ही शेतकरी हाणून पडणार आम्हाला आमची जमीन पाहिजे आम्हाला आमची काळी आई महत्त्वाची आहे. MMRDA नवनगर तीसरी मुंबई साठी आम्ही आमची जमीन देणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.आता नो काँप्रमाईज ,जमीन आमच्या हक्कांची नाही कुणाच्या बापाची, जय जवान जय किसान असा नारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती