सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा; उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, बारामती विजयानंतर तातडीने निर्णय
  • पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
  • थलपती विजय तमिळनाडूचा सेनापती होणार! बहुमतासाठी आवश्यक 10 आमदारांसाठी मास्टरप्लॅन सुद्धा ठरला
  • ममता बॅनर्जींचा पराभव नाही, मोदी शाहांनी इराण, इस्त्रायल युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली, हा 'लोकशाहीविरोधी' कट; संजय राऊतांचा घणाघात
  • 'वंदे मातरम्'चा अपमान आता महागात पडणार; केंद्राचा मोठा निर्णय, कायद्यात सुधारणा! 3 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड
 जिल्हा

महाबळेश्वरमधील ६० कुटुंबांना दिलासा, लीज प्रॉपर्टी मधील जागा कामगारांना निर्वाहासाठी देण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

डिजिटल पुणे    07-05-2026 11:50:45

मुंबई : महाबळेश्वर येथे शासनाच्या जागेवरील लीज प्रॉपर्टीमध्ये वर्षानुवर्षे ६० कामगार कुटुंबे काम करत आहेत. या प्रॉपर्टीवरील लीज संपल्यामुळे ही कुटुंबे बेघर होऊ शकतात. यामुळे २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार सर्वेक्षण करुन पात्र कुटुंबांना नियमानुसार जागा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.महाबळेश्वर येथील विविध प्रश्नांबाबत महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महाबळेश्वर येथील लीज प्रॉपर्टीमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासनाने सर्वांसाठी घरे ही संकल्पना मांडली असून त्यासाठी २५ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार २०११ पूर्वी शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा आधार घेऊन महाबळेश्वर येथील लीज प्रॉपर्टीमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण करुन पात्र ठरणाऱ्या कुटुंबीयांना नियमानुसार देय ठरणाऱ्या जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.या निर्णयामुळे लीज प्रॉपर्टी मध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती