सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
  • महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींनी पुन्हा मारली बाजी
 शहर

दहावी परीक्षेत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या शाळांचे उज्वल यश

डिजिटल पुणे    08-05-2026 16:51:27

पुणे : इयत्ता दहावीच्या  परीक्षेत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस ,पुणे कॅम्प )च्या अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल,अँग्लो उर्दू बॉईज स्कूल ,एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांनी चांगले यश मिळवले .महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या  अध्यक्ष  आबेदा इनामदार,सचिव प्रा.इरफान शेख,अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रोशन आरा शेख,अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचे  मुख्याध्यापक राज मुजावर,एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.असफिया अन्सारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल चा निकाल ९९.६० टक्के लागला.तसवीब आदिल शेख ही विद्यार्थिनी ९०.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली.अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलचा निकाल ९८.१४ टक्के लागला. उर्दू माध्यमात  मोहम्मद अली मोहम्मद शफीक शेख हा विद्यार्थी ८१.२० टक्के गुण मिळवून प्रथम आला.इंग्रजी माध्यमात मोहम्मद सकलेन इरफान हा विद्यार्थी ८७.८० टक्के गुण मिळवून प्रथम आला.एमसीईएस इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल ९८.२८ टक्के लागला.अल अमीन साकिब बोगदी हा विद्यार्थी ८९ टक्के गुण मिळवून प्रथम आला.


 Give Feedback



 जाहिराती