पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘भक्तिरंग’ या मराठी आणि हिंदी अभंग-भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,बापट रस्ता येथे होणार आहे.
या कार्यक्रमात गायक हेमंत खणंग हे मराठी आणि हिंदी अभंग तसेच भक्तिगीते सादर करणार आहेत. त्यांना संवादिनीवर संपदा खरे-देशपांडे, तबल्यावर केदार तळणीकर, पखवाजवर सागर सराटे, तालवाद्यावर नरेंद्र काळे तसेच बासरीवर अथर्व वैशंपायन यांची साथ लाभणार आहे.कार्यक्रमाचे निवेदन सरिता फडके करणार आहेत.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २९१ वा कार्यक्रम आहे,अशी माहिती भारतीय विद्या भवनचे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी सांगितले.