सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
  • युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
  • मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
  • पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा
 क्राईम

पुणे क्राईम ब्रँचची मोठी कारवाई; ऑनलाईन रॅकेटचा पर्दाफाश, ४ पीडितांची सुटका, ९ आरोपी अटक

डिजिटल पुणे    12-05-2026 15:06:05

पुणे : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्ष (AHTU), गुन्हे शाखा पुणे शहर यांनी मोठी कारवाई करत ऑनलाईन माध्यमातून सुरू असलेल्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४ पीडितांची सुटका करण्यात आली असून ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दिनांक 11/05/2026 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुणे शहरातील एका ठिकाणी “डार्क लॉजिक अँड बॉण्डिंग” नावाने ऑनलाईन माध्यमातून अवैध प्रकार सुरू असल्याचे उघड झाले. या रॅकेटमध्ये सोशल मीडिया, मोबाईल अ‍ॅप्स आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून गैरकायदेशीर व्यवहार चालवले जात असल्याचे तपासात समोर आले.

गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ छापा टाकत कारवाई केली असता ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले असून ९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये मोबाईल फोन व इतर डिजिटल उपकरणांचाही समावेश आहे.या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू असून रॅकेटचे इतर धागेदोरे तपासले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


 Give Feedback



 जाहिराती