सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
  • पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
 विश्लेषण

पुण्यात धक्कादायक घटना! घरगुती वादातून सुनेन सासूवर धारदार चाकूने वार करून केली हत्या

डिजिटल पुणे    13-05-2026 17:04:01

पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात घरगुती वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या वृद्ध सासूवर धारदार चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मृत महिलेचे नाव सुमन शिंदे (वय ८०) असे असून आरोपी सुनेचे नाव अनुपमा संजय शिंदे (वय ६०) आहे. दोघीही कात्रजजवळील आंबेगाव बुद्रुक परिसरातील समृद्धी रेसिडेन्सी येथे राहत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दीड ते अडीच वाजण्याच्या सुमारास सासू आणि सुनेमध्ये घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अनुपमा शिंदे यांनी घरातील एका महिलेला बेडरूममध्ये ढकलून बाहेरून कडी लावली. त्यानंतर त्यांनी स्वयंपाकघरातील चाकू घेत सासू सुमन शिंदे यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात सुमन शिंदे यांच्या गळ्यावर आणि हातावर अनेक वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या सुमन शिंदे या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी अनुपमा शिंदे यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती