मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज एका आगळ्यावेगळ्या अंदाजात विधानभवन गाठले, ज्याने राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचतीचे आणि पर्यावरणाप्रती जागरूक राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला कृतिशील प्रतिसाद देत, मुख्यमंत्र्यांनी स्वतः ‘रॉयल एनफिल्ड ३५०’ ही दुचाकी चालवत विधानभवन गाठण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीतून इंधन बचतीचा आणि साधेपणाचा एक सकारात्मक संदेश जनमानसात गेला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवनात आगळ्यावेगळ्या अंदाजात एन्ट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री स्वतः ‘रॉयल एनफिल्ड 350’ ही बुलेट चालवत विधान भवनात दाखल झाले. त्यांच्या सोबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे देखील दुचाकीवरून प्रवास करताना दिसले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासीयांना इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दुचाकीचा वापर करून एक सकारात्मक संदेश दिल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि इंधनाचा वाढता वापर लक्षात घेता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुचाकीचा पर्याय निवडला. विशेष म्हणजे, त्यांच्या सुरक्षेसाठी असलेला ताफाही यावेळी चारचाकीऐवजी दुचाकींवरून प्रवास करताना पाहायला मिळाला.
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्येही मुख्यमंत्र्यांनी हेल्मेट परिधान करून आणि वाहतूक नियमांचे पालन करत प्रवास पूर्ण केला. त्यामुळे रस्ते सुरक्षेबाबतही त्यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या ‘रॉयल’ एन्ट्रीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.