सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 जिल्हा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

डिजिटल पुणे    15-05-2026 16:39:08

सातारा : सतारानगरीचा थाट, सातारवासियांची मोठी उपस्थिती आणि उत्साही वातावरणात आतषबाजीसह  सातारा नगरपरिषदेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, आमदार सर्वश्री महेश शिंदे, सुनील कांबळे, अमित गोरखे, नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर व नगरसेवक यांच्यासह सातारावासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रती देऊन स्वागत केले.


 Give Feedback



 जाहिराती