सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 क्राईम

युट्यूबवरून शिकला बॉम्ब बनवण्याचा फंडा; उपचारासाठी पैसे उकळण्याच्या तयारीत आरोपी, हडपसर बॉम्ब प्रकरणात पुणे पोलिसांचा मोठा खुलासा

डिजिटल पुणे    15-05-2026 16:57:17

पुणे : हडपसरमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू ठेवून शहरात भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपीला महाराष्ट्र एटीएसने नागपूर रेल्वे स्थानकावरून अटक केली आहे. शिवाजी राठोड असे आरोपीचे नाव असून, तो आझाद हिंद एक्सप्रेसने नेपाळकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपीने युट्युबवरील व्हिडिओ पाहून बॉम्बसदृश्य वस्तू तयार केली होती. प्राथमिक तपासात या प्रकरणाला कोणताही दहशतवादी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले असून आरोपीने हे कृत्य एकट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान आरोपी नागपूरच्या दिशेने रेल्वेने पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर त्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून डिजिटल घड्याळ आणि बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी 10 मे रोजी वैयक्तिक उपचारासाठी संबंधित हॉस्पिटलमध्ये गेला होता. मात्र त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने हॉस्पिटलकडून खंडणी उकळण्याचा त्याचा प्लॅन होता. आरोपीने अद्याप कोणतीही खंडणी मागितली नव्हती, मात्र धमकी देण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अवघ्या 400 रुपयांत आरोपीने ही बॉम्बसदृश्य वस्तू तयार केली होती. यात डिजिटल घड्याळ, चार पाईप, लाल-काळ्या वायर आणि सेलोटेपचा वापर करण्यात आला होता. फॉरेन्सिक तपासात या वस्तूमध्ये कोणतेही स्फोटक साहित्य नसल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत.

आरोपी मूळचा सोलापूर येथील असून मांजरी परिसरात कपडे आणि शूजचे दुकान चालवत होता. त्याच्या घरातून सुमारे दोन किलो गांजाही जप्त करण्यात आला असून त्याचाही स्वतंत्र तपास सुरू आहे. आरोपी पुढे हावडा मार्गे नेपाळला जाण्याच्या तयारीत होता. त्याची बहीण नेपाळमध्ये राहत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती