सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

नगरसेवक हरिदास चरवड यांच्या उपस्थितीत वडगाव बुद्रुकमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

डिजिटल पुणे    15-05-2026 17:07:51

पुणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त वडगाव बुद्रुक येथे पंचामृत अभिषेक व शिव-शंभू वंदना कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समस्त ग्रामस्थ वडगाव बुद्रुक, केदारनाथ सार्वजनिक वाचनालय व सामाजिक संस्था तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज प्रतिष्ठान, वडगाव बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पंचामृत अभिषेक करण्यात आला तसेच शिव-शंभू वंदनेद्वारे महाराजांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, शिवप्रेमी आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या प्रसंगी नगरसेवक हरिदास चरवड, संजय पवळे, चंदन कड, केदारनाना जाधव, युवराज जाधव, स्वप्निल वाघ, संदीप चरवड, संग्राम पवार, सिद्धार्थ पिसाळ, आकाश उभे, सुनिल चरवड, गणेश इंडे, पंकज फुले, मुगुट पासलकर, अनिल वाईगडे, अभिजित कवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. तसेच महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

“जय जिजाऊ, जय शिवराय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला असून वातावरण शिवमय झाले होते.

 

 


 Give Feedback



 जाहिराती