सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 क्राईम

पिंपरी-चिंचवडमध्ये एजे फर्निचर मॉलवर गोळीबार; शुभम लोणकरच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ, व्यावसायिकाला थेट धमकी

डिजिटल पुणे    16-05-2026 18:29:57

पिंपरी-चिंचवड : पुणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांदरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी रात्री धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. शहरातील प्रसिद्ध एजे फर्निचर मॉलवर अज्ञात शुटर्सनी गोळ्या झाडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमुळे लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 9.20 ते 9.25 वाजण्याच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी एजे फर्निचर मॉलसमोर येत अचानक गोळीबार केला. आरोपींनी मॉलच्या दिशेने 5 ते 6 राऊंड फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे. गोळ्या मॉलच्या नेमप्लेट आणि काचेवर लागल्याने नुकसान झाले. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

दरम्यान, या गोळीबारानंतर सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीच्या अकाउंटवरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित पोस्टमध्ये एजे फर्निचर मॉलचे मालक अशोक नैन यांच्याबाबत गंभीर आरोप करत हा “फक्त ट्रेलर” असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील वेळी थेट जीवघेणा हल्ला केला जाईल, अशी धमकीही पोस्टमध्ये देण्यात आल्याचे समोर आले आहे.

याशिवाय, लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेली एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. या ऑडिओमध्ये विरोध करणाऱ्यांना थेट इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा ऑडिओ खरोखरच संबंधित गँगशी जोडलेला आहे का, याबाबत पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती