सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 क्राईम

उरुळी कांचन हादरलं !पत्नीवर अमानुष अत्याचार ; गुप्तांगावर ॲसिड टाकून पत्नीला जखमी अवस्थेत १५ दिवस घरातच कोंडून ठेवलं

डिजिटल पुणे    18-05-2026 12:35:11

पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरातून मानवतेला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तसेच मुलगा होत नसल्याच्या कारणावरून एका पतीने आपल्या २४ वर्षीय पत्नीवर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. आरोपीने पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड ओतून तिला तब्बल १५ दिवस घरातच कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० एप्रिल रोजी घडली. आरोपी पती दारूच्या नशेत घरी आल्यानंतर पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत शिवीगाळ व मारहाण करू लागला. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने घरात आणलेल्या ॲसिडची बाटली पत्नीच्या गुप्तांगावर ओतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात न नेता आरोपीने घरातच डांबून ठेवल्याचा आरोप आहे.

असह्य वेदनांनी विव्हळलेल्या पीडितेने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने दरवाजा बंद करून पुन्हा मारहाण केल्याचे सांगण्यात आले. पीडितेच्या आरडाओरड्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला. दरम्यान, आरोपीने कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आणि तेथून पसार झाला.

काही दिवसांनी पती कामावर गेल्याची संधी साधत पीडित महिलेने आपल्या दोन मुलींना घेऊन माहेर गाठले. तेथे तिने नातेवाईकांना संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर तिला उरुळी कांचन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी तातडीने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे उरुळी कांचन परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती