पुणे : कोरेगाव पार्क परिसरात महिलेसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री हॉटेलमधील पार्टीनंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने महिलेला कारमध्ये नेऊन तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि आरोपी यांची ओळख पार्टीदरम्यान झाली होती. पार्टी संपल्यानंतर घरी सोडण्याचे आश्वासन देत तिला कारमध्ये बसवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात गैरवर्तन झाल्याचा आरोप असून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक काम करत आहे.या घटनेनंतर पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात या घटनेबाबत संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.