सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

वडगाव खुर्दमध्ये “माझा प्रभाग स्वच्छ प्रभाग” अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम

डिजिटल पुणे    18-05-2026 17:31:46

पुणे : “माझा प्रभाग स्वच्छ प्रभाग” अभियानाच्या दुसऱ्या रविवारी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने वडगाव खुर्द येथील मधुकोष सोसायटी परिसरात विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक तसेच पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

मोहीमेदरम्यान परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा साचलेला कचरा, अनधिकृतरीत्या टाकण्यात आलेल्या जुन्या गाद्या, उशा, कपडे, प्लास्टिक साहित्य, लाकडी वस्तू तसेच राडारोडा हटविण्यात आला. या उपक्रमात तब्बल दहा गाड्या भरून कचरा उचलण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली तसेच परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

आगामी काळात दर रविवारी आरोग्य विभाग, गृहरचना सोसायटीचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने अशा स्वच्छता मोहिमा नियमित राबविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या उपक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते सारंगजी नवले उपस्थित होते. परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती