सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

पुण्यात देवदूत ठरले MSF जवान; हरवलेली चिमुकली सुखरूप आई-वडिलांना सोपवली

डिजिटल पुणे    19-05-2026 11:33:11

पुणे : पुण्यातील गर्दीच्या दगडूशेठ मंदिर परिसरात हरवलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीला MSF जवान कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत सुखरूप तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवलं. विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाकडून अतिक्रमण कारवाई सुरू असताना तांबडी जोगेश्वरी मंदिर बोळ परिसरात ही चिमुकली रडताना आढळली होती.

MSF जवान आदित्य माने, प्रतीक करणे आणि मनीषा बांगर यांनी तत्काळ मुलीला ताब्यात घेत तिची विचारपूस केली. मुलीच्या कपाळावरचा गंध आणि हातातील गुलाबाचं फूल पाहून ती मंदिर परिसरात हरवली असावी असा अंदाज घेत तिघांनी श्रीमंत दगडूशेठ मंदिर परिसरात शोधमोहीम सुरू केली. अखेर कर्नाटकच्या बिदर येथून दर्शनासाठी आलेल्या कुटुंबाचा शोध लागला आणि चिमुकलीला सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. यामुळे MSF जवानांचं पुणेकरांकडून कौतुक केलं जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती