सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 विश्लेषण

चार दिवसांत दुसऱ्यांदा इंधन दरवाढ; महाराष्ट्रात पेट्रोल 109 रुपयांच्या पार, नागरिकांची चिंता वाढली

डिजिटल पुणे    19-05-2026 15:30:37

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. मंगळवारपासून लागू झालेल्या नव्या दरांनुसार पेट्रोलच्या किमतीत 91 पैशांची, तर डिझेलमध्ये 94 पैशांची वाढ झाली आहे. याआधी 15 मे रोजीही इंधन दरात मोठी वाढ करण्यात आली होती. सलग होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक आणि वाहतूक क्षेत्रावर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, तसेच इराण-अमेरिका-इस्रायल तणावाचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांवरील वाढता आर्थिक ताण कमी करण्यासाठी इंधन दरवाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आगामी काळातही कच्च्या तेलाचे दर उच्चांकी राहिल्यास इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील नवे इंधन दर

मुंबई : पेट्रोल 107.49 रुपये, डिझेल 94.02 रुपये

पुणे : पेट्रोल 107.86 रुपये, डिझेल 94.40 रुपये

नागपूर : पेट्रोल 108.06 रुपये, डिझेल 94.63 रुपये

सोलापूर : पेट्रोल 108.21 रुपये, डिझेल 94.75 रुपये

कोल्हापूर : पेट्रोल 108.37 रुपये, डिझेल 94.93 रुपये

नाशिक : पेट्रोल 108.84 रुपये, डिझेल 95.35 रुपये

रायगड : पेट्रोल 108.82 रुपये, डिझेल 95.30 रुपये

अमरावती : पेट्रोल 109.15 रुपये, डिझेल 95.68 रुपये

परभणी : पेट्रोल 109.49 रुपये, डिझेल 95.96 रुपये

रत्नागिरी : पेट्रोल 109.53 रुपये, डिझेल 96.06 रुपये

गोंदिया : पेट्रोल 109.54 रुपये, डिझेल 96.08 रुपये

सिंधुदुर्ग : पेट्रोल 109.55 रुपये, डिझेल 96.07 रुपये

दरम्यान, महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात इंधन दर काहीसे कमी असून तेथे पेट्रोल 101.25 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.सलग वाढणाऱ्या इंधन दरांचा परिणाम वाहतूक, भाजीपाला, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 News Feedback

Digital Pune
Harakchand Jain
 19-05-2026 19:47:47

वाढवायलाच हवे त्या शिवाय खप घटणार नाही परवडेल तो वापरेल अन्यथा गाड्या विकावे सोबत फूक्टे पोसणे बंद करा सगल्या कल्याणकारी योजना 5 वर्ष बंद करा

 Give Feedback



 जाहिराती