सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
  • यूपी, बिहारमध्ये वादळ आणि पावसामुळे 48 जणांचा मृत्यू; इनोव्हा ट्रॅक्टरसह 10 वाहने वाहून गेली; बिहारमध्ये 4 विमानांचे मार्ग बदलले, 18 विमानांना विलंब; पंजाबमध्ये गारपिट वादळ
  • धडाकेबाज तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, पिंपरीतील विषारी दारुकांडाचे भिवंडी कनेक्शन उघड, मोठा साठा जप्त
  • ‘देऊळ बंद 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; 9 दिवसांत 39 कोटींचा टप्पा पार, अनेक सुपरहिट चित्रपटांना टाकलं मागे
 जिल्हा

पुण्यात पुन्हा गँगवॉरचा भडका ! जेलमध्ये असतानाही बंडू आंदेकर सक्रिय? बालाजीनगरमध्ये वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावाची हत्या

डिजिटल पुणे    20-05-2026 12:11:09

पुणे : पुणे शहरातील आंदेकर-कोमकर टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला असून बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील एका आरोपीच्या भावावर आंदेकर टोळीशी संबंधित शुटर्सनी गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

वनराज आंदेकर हत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या सूडाच्या मालिकेतील हा आणखी एक हल्ला मानला जात आहे. विशेष म्हणजे आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर, त्याची मुलगी आणि सून सध्या तुरुंगात असतानाही टोळीची हालचाल सुरू असल्याची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. तुरुंगातूनच टोळीचे संचालन होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

2025 मध्ये गणेशपेठ परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात नातेवाईकांचाही सहभाग समोर आला होता. त्यानंतर आंदेकर टोळीने बदला घेण्याची मालिका सुरू केल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.

काही महिन्यांपूर्वी आयुष कोमकर याची घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कात्रज-घोलेवाडी परिसरात शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. हे दोघेही वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपींचे नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. आता बालाजीनगरातील ताज्या गोळीबारामुळे या गँगवॉरने पुन्हा हिंसक वळण घेतले आहे.

दरम्यान, या टोळीशी संबंधित काही सदस्यांनी तुरुंगात असतानाही निवडणूक लढवून विजय मिळवला होता. त्यामुळे गुन्हेगारी आणि स्थानिक राजकारणातील संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत. या ताज्या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुप्त माहिती यंत्रणा आणि कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती