सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 क्राईम

जातीचा द्वेष अन् हुंड्याचा छळ; विवाहितेचे 8 वेळा गर्भपात केल्याचा आरोप, नाशिक हादरलं

डिजिटल पुणे    21-05-2026 12:35:22

नाशिक : प्रेमविवाह करूनही जात वेगळी असल्याच्या कारणावरून एका विवाहितेला अमानुष छळाला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ करत तब्बल आठ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, प्रेमविवाहानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र काही दिवसांतच “तू आमच्या जातीची नाहीस” असे म्हणत सासरच्या मंडळींकडून तिचा अपमान आणि छळ सुरू झाला. महिला गर्भवती झाल्यानंतर “तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही” असे सांगून तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक दबावामुळे आणि मारहाणीमुळे तिला वारंवार गर्भपात करावा लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

इतकेच नव्हे तर, महिलेला मानसिक रुग्ण ठरवून रुग्णालयात दाखल करण्याची धमकीदेखील दिली जात होती. पीडित महिला पुण्यात नोकरी करत होती. नोकरी सोडल्यानंतर ती जुलै 2025 मध्ये नाशिकला परतल्यानंतर छळ अधिक वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घर खरेदीसाठी पतीने तिचे सोन्या-चांदीचे दागिने विकून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे. त्यानंतरही हुंड्यासाठी आणि पैशांसाठी तिला सतत त्रास दिला जात होता. जातीय भेदभावामुळे घरात आणि समाजात सन्मानाने जगू दिले जात नसल्याची भावना पीडितेने व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हसरूळ पोलिसांनी पती विजय महाजन, सासू निर्मला महाजन आणि सासरे दशरथ महाजन यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती