सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
  • रायगड जिल्ह्यात हायवा ट्रकसह पुल कोसळला; 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
  • CM फडणवीसांनी चालवलेल्या बुलेटच्या PUC वरुन राजकारण; वर्षा गायकवाडांसाठी भाजपकडून खुलासा, बन म्हणाले 'ती' गाडी पोलिसांची
  • ताफा सोडणाऱ्यांनी दिखावा करू नये, एक दोन दिवसांची बचत नको, त्यामध्ये सातत्य हवं; शरद पवारांचा नेत्यांना सल्ला
 शहर

पुणे: अचानक बदललेल्या हवामानामुळे मध्यवर्ती भागात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी

डिजिटल पुणे    22-05-2026 16:51:47

पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवारी दुपारनंतर हवामानात अचानक मोठा बदल जाणवला. शिवाजीनगर, कसबा पेठ आणि सोमवार पेठ परिसरात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन असताना सुमारे तीनच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यानंतर ३.४५ नंतर पावसाचा जोर वाढल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या हलताना दिसल्या, तर रस्त्यांवरील वाहनचालकांना अचानक आलेल्या पावसापासून बचावासाठी धावपळ करावी लागली. कार्यालय सुटण्याच्या वेळेतच पावसाने हजेरी लावल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा वेग मंदावला.

कसबा पेठ आणि सोमवार पेठ परिसरातील काही अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्रही दिसून आले. फेरीवाले आणि हातगाडी व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून अनेकांनी आपला माल प्लास्टिकने झाकून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला.

अचानक झालेल्या या बदलत्या हवामानामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी अवकाळी पावसामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाल्याचे चित्र शहराच्या मध्यवर्ती भागात पाहायला मिळाले.


 Give Feedback



 जाहिराती