सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नीट पेपरफुटीप्रकरणी पुणे केंद्रबिदू; पेपर फोडणारे तिघंही पुण्याचेच, तीन विषय अन् तीन शिक्षक दीड ते दोन किलोमीटरच्या रेडीयसमधले, एनटीएही संशयाच्या भोवऱ्यात
  • मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील तीन तासांत पाऊस पडणार, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
  • कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ व्हायरल, समर्थकांना धोक्याचा इशारा, म्हणाले, 'सरकार आपल्या चुकीचीच वाट बघतंय'
  • मोठी बातमी, अभिजीत दीपकेचं इन्स्टाग्राम खातं हॅक, कॉकरोच जनता पार्टीचं इन्स्टावरील बॅकअप अकाऊंट हटवलं
 क्राईम

लेकरासाठी डायपर आणायला बाहेर पडला, पण घरी परतलाच नाही; सोलापुरात २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

डिजिटल पुणे    23-05-2026 11:10:15

सोलापूर : मुलासाठी डायपर घेऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेल्या २४ वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे. विजापूर रोड परिसरात शुक्रवारी रात्री ही धक्कादायक घटना उघडकीस आली. सुफियान गुलाम रसूल शेख असे मृत तरुणाचे नाव असून तो फॅब्रिकेशनचे काम करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सुफियानचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि त्याला एक लहान मुलगा आहे. शुक्रवारी सायंकाळी तो “मुलासाठी डायपर आणतो” असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही तो परत न आल्याने कुटुंबीय चिंतेत पडले.

दरम्यान, विजापूर रोड परिसरातील पनाश अपार्टमेंटजवळ रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक फेरफटका मारत असताना एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तसेच हात-पायही वाकड्या अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा सुरू केला असताना मृताच्या मोबाईलवर कॉल आला. बराच वेळ संपर्क होत नसल्याने कुटुंबीय त्याला फोन करत होते. पोलिसांनी फोन उचलत घडलेली घटना सांगितल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.सुफियान नेमका विजापूर रोड परिसरात कसा पोहोचला? त्याचा मृत्यू अपघात, आत्महत्या की घातपातामुळे झाला? याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती