सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 राज्य

मोठी बातमी : अभिजीत दीपके यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक? ‘कॉकरोच जनता पार्टी’चं बॅकअप पेजही हटवलं

डिजिटल पुणे    23-05-2026 12:19:04

नवी दिल्ली : सोशल मीडियावर चर्चेत असलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटबाबत मोठा दावा केला आहे. दीपके यांनी एक्सवर पोस्ट करत आपलं अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. तसेच पक्षाचं बॅकअप म्हणून तयार करण्यात आलेलं दुसरं इन्स्टाग्राम अकाऊंटही हटवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान युवकांचा उल्लेख “परजीवी” आणि “झुरळं” असा केल्याचा मुद्दा देशभर चर्चेत आला होता. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाने मोहीम सुरू केली. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून इन्स्टाग्रामवरील पक्षाच्या अकाऊंटला तब्बल 2 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, दीपके यांनी यापूर्वीही त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवर हॅकिंगचे प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. आता त्यांचं मूळ इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचं समोर आलं असून बॅकअप अकाऊंटही हटवण्यात आल्याने समर्थकांमध्ये चर्चा रंगली आहे.

याशिवाय, ‘कॉकरोच जनता पार्टी’चं एक्स अकाऊंटही काही काळासाठी ब्लॉक करण्यात आलं होतं. कायदेशीर विनंतीनंतर भारतात हे अकाऊंट रोखण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दीपके यांनी “Cockroach Is Back” नावाने नवं एक्स अकाऊंट सुरू केलं असून त्यालाही अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळत आहे.

अभिजीत दीपके यांनी त्यांना सोशल मीडियावर धमक्या मिळत असल्याचाही दावा केला आहे. संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ त्यांनी एक्सवर शेअर केले आहेत. तसेच “कॉकरोच जनता पार्टी”च्या बहुतांश फॉलोअर्स भारतीयच असल्याचं सांगत त्यांना पाकिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


 Give Feedback



 जाहिराती