सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात 14 दिवस जमावबंदी; मोर्चे-सभा बंद, महापालिकेचे इंधन बचतीचे कडक आदेश
  • पुन्हा इंधनदरांचा भडका! पेट्रोल-डिझेल महागले; 10 दिवसांत चौथी वाढ, मुंबईत पेट्रोल 111 रुपयांच्या पार
 विश्लेषण

रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात: स्कॉर्पिओ दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

डिजिटल पुणे    25-05-2026 12:55:40

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील धोकादायक समजल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात घडला. एका स्कॉर्पिओ कारचा अंदाजे 1000 फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला असून या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

स्थानिक प्रशासन, पोलीस तसेच महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या मदतीने रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. कठीण भूप्रदेश आणि खोल दरीमुळे मृतदेह बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.

अपघातग्रस्त वाहन सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील असल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये 18 ते 35 वयोगटातील तरुणांचा समावेश असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.घटनास्थळी दोरीच्या सहाय्याने स्ट्रेचर वापरून बचावकार्य केले जात असून मृतदेह पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

दरम्यान, आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक रस्ता म्हणून ओळखला जातो. याच परिसरात 2018 साली झालेल्या बस अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या नव्या दुर्घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती