सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यात 14 दिवस जमावबंदी; मोर्चे-सभा बंद, महापालिकेचे इंधन बचतीचे कडक आदेश
  • पुन्हा इंधनदरांचा भडका! पेट्रोल-डिझेल महागले; 10 दिवसांत चौथी वाढ, मुंबईत पेट्रोल 111 रुपयांच्या पार
 शहर

दत्तनगर–भारती विद्यापीठ रस्त्यावरील हॉटेलला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

डिजिटल पुणे    25-05-2026 15:00:45

पुणे : त्रिमूर्ती चौक ते दत्तनगर चौकाकडे जाणाऱ्या तिरंगा चौक परिसरातील ‘श्री जी पुअर व्हेज’ हॉटेलला सायंकाळी सुमारे ७ वाजून ६ मिनिटांनी अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तनगर–भारती विद्यापीठ रस्त्यावरील राजमाता भुयारी मार्गाजवळील बहुमजली इमारतीतील या हॉटेलमध्ये अचानक आग भडकल्याने मोठ्या प्रमाणात धूर पसरला. धुरामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच कात्रज अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी फायरगाडी आणि होज रीलच्या साहाय्याने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.

अग्निशमन अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता आहे. वेळेत कारवाई झाल्याने मोठी दुर्घटना टळली असून हॉटेलचे किरकोळ नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनास्थळी कात्रज अग्निशमन केंद्रप्रमुखांसह इतर जवानांनी कामगिरी बजावली. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.परिसरात परिस्थिती सध्या नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती