पुणे :भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'कलासक्त,पुणे' प्रस्तुत “आजी, हातोको आणि पत्रं” या विशेष अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,सेनापती बापट रस्ता येथे होणार आहे.
जपानी लेखिका इतो ओगावा लिखित “त्सुबाकी स्टेशनर्स ” या गाजलेल्या कादंबरीतील निवडक भागांचे अभिवाचन या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मयुरेश कुलकर्णी यांनी केला आहे.कार्यक्रमात अभिवाचन संहिता लेखन आणि दिग्दर्शन उज्ज्वला बर्वे यांचे असून पत्र सुलेखन मयुरेश कुलकर्णी आणि मैत्रेयी कुलकर्णी सादर करणार आहेत. संगीत संयोजन चैतन्य दीक्षित यांचे असून ध्वनी व दृश्य संयोजन सोनिया शारंगपाणी आणि स्वरगंधा दीक्षित यांनी केले आहे.या कार्यक्रमात मयुरेश कुलकर्णी, सुनंदा महाजन, उज्ज्वला बर्वे, चैतन्य दीक्षित आणि स्नेहल दामले हे कलाकार सहभागी होणार आहेत.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २९२ वा कार्यक्रम असून सर्वांना प्रवेश विनामूल्य असल्याची माहिती भारतीय विद्या भवन चे संचालक प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.