सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 जिल्हा

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधु दंडवते यांचे नाव; राज्य मंत्रिमंडळात 4 महत्त्वाचे निर्णयांना मंजुरी

डिजिटल पुणे    26-05-2026 15:52:03

मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (26 मे) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

मंत्रिमंडळ बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या स्थानकाचे नामकरण ‘लोकनेते मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. कोकणातील जनतेची ही दीर्घकाळाची मागणी असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

तसेच बैठकीत पेट्रोल-डिझेल टंचाईबाबतही चर्चा झाली. काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या अल्पकालीन टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी ऑईल कंपन्यांशी समन्वय सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

मंत्रिमंडळातील इतर प्रमुख निर्णय :

शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मंजुरी

डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला 4 एकर 25 गुंठे जमीन नाममात्र दरात देण्यास मान्यता

नवीन नागपूर आणि बाह्य वळण रस्ता प्रकल्पासाठी जमीन खरेदीवरील मुद्रांक व नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय

या निर्णयांमुळे प्रशासनिक तसेच विकासकामांना गती मिळेल, असा सरकारचा दावा आहे.


 Give Feedback



 जाहिराती