सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुणेकरांनो अलर्ट! आजपासून पुण्यात 14 दिवस निर्बंध; मोर्चे, सभा बंद, ‘कार पुलिंग’ सक्तीचं
 शहर

वाकड परिसरातील सर्व्हिस रोड काँक्रीटीकरणाला अखेर सुरुवात; नागरिकांकडून समाधान व्यक्त

अजिंक्य स्वामी    26-05-2026 16:31:27

पुणे :  वाकड हद्दीतील हायवेच्या सर्व्हिस रोडच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. टिप-टॉप हॉटेल ते भूमकर चौक या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरील सर्व्हिस रोडच्या कामाचे नारळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. या कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातून विकासाचा वेग अधिक गतिमान होत असून, या रस्त्याच्या काँक्रीटीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावरील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

याबद्दल डिजिटल पुणे न्यूजने वेळोवेळी आवाज उठवला होता. आता महानगरपालिकेची निवडणूक उरकताच विद्यमान नगरसेवक राहुल कलाटे, श्रुती वाकडकर आणि कुणाल वाव्हळकर यांच्या पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमावेळी नगरसेवक राहुल कलाटे, श्रुती वाकडकर, कुणाल वाव्हळकर, NHAI चे अधिकारी विनोद पाटील, महानगरपालिकेचे (ड) प्रभाग कनिष्ठ अभियंता विवेक ताकवले तसेच BRTS चे अधिकारी चंद्रकांत मोरे उपस्थित होते.

 

 


 Give Feedback



 जाहिराती