सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पोर्शे कारने उडवून दोघांचा जीव घेतला, पण अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम, जेलमधून सुटताच जंगी सेलिब्रेशन
  • केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
  • मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला
 शहर

‘गुड मॉर्निंग ग्रुप’साठी श्री. योगेश सोमण यांचा ‘आनंद डोह’ एकपात्री प्रयोग संपन्न

डिजिटल पुणे    27-05-2026 10:48:46

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. योगेश सोमण यांच्या प्रभावी अभिनयाने साकारलेला संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ‘आनंद डोह’ हा विशेष एकपात्री प्रयोग ‘गुड मॉर्निंग ग्रुप’साठी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. साहित्य, अध्यात्म आणि संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून उपस्थितांना लाभली.

कार्यक्रमास महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष श्री. प्रदीप निफाडकर, कार्यवाह श्री. सुनील महाजन, सौ. अंजली कुलकर्णी तसेच डॉ. आशुतोष जावडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. एस. बी. लोहोकरे यांनी ‘गुड मॉर्निंग ग्रुप’च्या सांस्कृतिक उपक्रमांचा परिचय करून देत उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. अनिल जगताप यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत या विशेष उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

विशेष म्हणजे, ‘गुड मॉर्निंग ग्रुप’चे सर्व सदस्य या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. समूहातील सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. साहित्य आणि संतपरंपरेविषयी असलेली त्यांची आस्था या निमित्ताने प्रकर्षाने जाणवली.

‘आनंद डोह’ या एकपात्री प्रयोगातून श्री. योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराजांचे जीवन, विचार, भक्ती आणि समाजप्रबोधन अत्यंत प्रभावी शैलीत उभे केले. त्यांच्या सशक्त अभिव्यक्तीमुळे उपस्थित रसिक अक्षरशः भारावून गेले. अध्यात्मिक चिंतन, विनोद, भावस्पर्शी प्रसंग आणि सामाजिक आशय यांचा सुंदर मिलाफ या प्रयोगात अनुभवायला मिळाला.

या प्रसंगी श्री. योगेश सोमण यांनी मनोगतात सांगितले की, साहित्य आणि संतपरंपरा समाजाला सकारात्मक दिशा देण्याचे कार्य करतात आणि अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक मूल्यांचे जतन अधिक प्रभावीपणे होते.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘गुड मॉर्निंग ग्रुप’चे सदस्य तसेच भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम साहित्यप्रेम, अध्यात्मिक आनंद आणि सांस्कृतिक उत्साहाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.


 Give Feedback



 जाहिराती