पुणे : 'तेर पॉलिसी सेंटर ' या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पुणे स्थित संस्थेने ' टाटा स्टील कलर्स' च्या सहकार्याने एन्व्हायरॉथॉन - रन फॉर एन्व्हायर्नमेंट ' हा उपक्रम आयोजित केला आहे . दि.१४ जून २०२६ रोजी पुणे ग्रामीण पोलीस हॉकी ग्राउंड(पाषाण) येथे पहाटे ५ ३० वाजता या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे.पर्यावरण जागृतीसाठी हा उपक्रम असून जास्तीत जास्त पर्यावरणदुतांनी या मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेने केले आहे. 'या उपक्रमाचे हे ५ वे वर्ष आहे. ही फक्त स्पर्धा नसून पर्यावरण जागृतीसाठीचा जागर आहे. या मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासाठी संस्थेतर्फे एक झाड लावून ते जतन केले जाते',अशी माहिती तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक डॉ.विनिता आपटे यांनी पत्रकाद्वारे दिली.
यावर्षी पुणे,दौंड,मुंबई,कर्नाटक,आसाम,दिल्ली,हरियाणामधून अनेक पर्यावरणप्रेमी स्पर्धक सहभागी होणार आहेत.स्पर्धा १२ ते १८ ,१९ ते ४०,४१ ते ५५ व ५६ पेक्षा जास्त अशा गटामधून घेण्यात येणार आहे .तीन,पाच आणि दहा किलोमीटरसाठी होणाऱ्या या स्पर्धेत १० किमी साठी रोख पारितोषिक व पाच व ३ किमी साठी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत .नावनोंदणी दि.३१ मे २०२६ पर्यंत करता येईल . अनेक कंपन्यांचे मोठे गट सहभागी होणार आहेत .नाव नोंदणीसाठी ९८३४३०५१२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवर करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
जागृती आणि संवर्धनासाठी उपक्रम
तेर (टेक्नॉलॉजी, एज्युकेशन, रिसर्च, रिहॅबिलिटेशन फॉर द एन्व्हॉयर्नमेंट) ही स्वयंसेवी पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करते. तेर पॉलिसी सेंटर ही संस्था जंगल वाढविणे , नागरी उद्यान निर्मिती,कांदळवन संरक्षण,विहिरींचे पुनरुज्जीवन करणे , पर्यावरण शिक्षण व पर्यावरण जागृती साठी प्रयत्नशील असणारी संस्था आहे. संस्थेने आजपर्यंत पुण्यासह महाराष्ट्र ,गुजराथ ,कर्नाटक ,आसाम ,भुवनेश्वर ,गोवा ,राजस्थान इथे विविध ठिकाणी तेरा लाखापेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांची जोपासना केली आहे.पर्यावरण जागृतीसाठी तेर ऑलिम्पियाड, एन्व्हायरॉथॉन यासारख्या स्पर्धांचे आयोजन सातत्याने केले जाते. 'संस्थेतर्फे विविध संस्थेच्या सर्वच उपक्रमांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो , त्यामुळे कामाचा उत्साह वाढतो' ,असे तेर पॉलिसी सेंटर च्या संस्थापक डॉ.विनिता आपटे यांनी सांगितले.