सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : पोर्शे कारने उडवून दोघांचा जीव घेतला, पण अग्रवाल कुटुंबाचा मस्तवालपणा कायम, जेलमधून सुटताच जंगी सेलिब्रेशन
  • केरळमध्ये ED विरुद्ध कार्यकर्त्यांचा संताप; अधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला, विटाही फेकल्या, मोदींविरुद्ध घोषणाबाजी
  • मोठी बातमी : डी के शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, तर लिंगायत, दलित, OBC आणि अन्य असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला
 जिल्हा

मुंबई महापालिकेतील 4 वादग्रस्त प्रस्तावांना ब्रेक; आदित्य ठाकरे–फडणवीस चर्चेनंतर मोठा निर्णय, शिंदे गटाला धक्का

डिजिटल पुणे    27-05-2026 17:33:28

मुंबई : मुंबई महापालिकेतील चार महत्त्वाच्या आणि वादग्रस्त प्रस्तावांना तात्पुरती स्थगिती मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुधार समितीत हे प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवण्यात आले असून या निर्णयामागे राजकीय हालचाली आणि वरिष्ठ पातळीवरील संवाद निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावांना तीव्र विरोध करत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या आक्षेपानंतर आणि प्रशासनावर दबाव वाढल्यानंतर सेव्हनहिल्स रुग्णालयाचे PPP मॉडेलद्वारे खासगीकरण, उपनगरी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे PPP प्रस्ताव, वांद्रे रेक्लेमेशनमधील Exhibition Centre प्रकल्प तसेच मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचा प्रस्ताव या चारही मुद्द्यांवर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या घडामोडींमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातल्याची माहिती समोर आली आहे. काही अहवालांनुसार, आदित्य ठाकरे आणि इतर राजकीय नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बाब पोहोचली आणि त्यानंतर प्रशासनाला प्रस्तावांवर पुढे न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या.या प्रकरणात भाजप आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही मध्यस्थी करत मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तातडीने अहवाल मागवून प्रस्ताव थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या घडामोडींमुळे शिवसेना शिंदे गटासाठी काही प्रमाणात राजकीय अस्वस्थता निर्माण झाल्याचे निरीक्षण आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने या निर्णयाचे स्वागत करत “मुंबईकरांचा विजय” असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.मुंबई महापालिकेतील या घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष तात्पुरता थांबला असला तरी आगामी काळात या विषयावर पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती