सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले, "विरोधकांनी 20 पैसे पर कमेंट..."
 क्राईम

मोठी बातमी : नसरापूर अत्याचार प्रकरणात आरोपीवर 28 दिवसांत आरोप निश्चित; आता रोज फास्टट्रॅक सुनावणी

डिजिटल पुणे    28-05-2026 14:37:50

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीविरोधात अवघ्या 28 दिवसांत न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले असून आता या खटल्याची रोज ‘इन कॅमेरा’ पद्धतीने फास्टट्रॅक सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आरोपीविरोधात प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदवल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील आरोपीला पहिल्यांदाच प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान आरोपीच्या वकिलांकडून आरोपांना विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय अहवाल आणि दोषारोपपत्राच्या आधारे न्यायालयाने आरोपीवर आरोप निश्चित केले.

या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत चार्जशीट दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयात त्यावर सुनावणी पार पडली. लैंगिक अत्याचाराशी संबंधित तपास, सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा आढावा घेतल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी रोज घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, 1 मे रोजी नसरापूर येथे ही धक्कादायक घटना घडली होती. घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला आरोपीने गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली. आरोपीने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती मृतावस्थेत आढळून आली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. ग्रामस्थांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आता या प्रकरणातील सुनावणी वेगाने पार पडणार असल्याने पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती