सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले, "विरोधकांनी 20 पैसे पर कमेंट..."
 क्राईम

संशयातून संताप अनावर! कपड्यांच्या दुकानात घुसून प्रेयसीला बेदम मारहाण; नंतर पाय धरून मागितली माफी, CCTV व्हायरल

डिजिटल पुणे    28-05-2026 16:40:07

पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात संशयाच्या कारणावरून एका तरुणाने आपल्या प्रेयसीला कपड्यांच्या दुकानात घुसून अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापाच्या भरात आरोपी तरुणाने तरुणीला लाथा-बुक्क्यांनी आणि चापटांनी मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू होता. त्यातून संशय वाढल्याने आरोपी तरुण थेट दुकानात पोहोचला आणि सर्वांसमोरच प्रेयसीवर हल्ला चढवला. दुकानातील कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आरोपीचा राग शांत झाला आणि त्याने तरुणीचे पाय धरून माफी मागितल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. मात्र, संबंधित तरुणीने हा आमचा वैयक्तिक वाद असल्याचे सांगत प्रियकराविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती