सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले, "विरोधकांनी 20 पैसे पर कमेंट..."
 जिल्हा

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

डिजिटल पुणे    28-05-2026 16:41:42

मुंबई  : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येईल. मच्छीमार, किनारी भागातील नागरिक आणि सागरी वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मंत्रालयात सागरी किनारीपट्टी सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.राज्यातील किनारी सुरक्षेची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय वाढविणे, सागरी गस्त अधिक बळकट करणे तसेच पोलीस विभागासाठी आवश्यक जेट्टी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन गंभीर असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती