सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले, "विरोधकांनी 20 पैसे पर कमेंट..."
 शहर

पुण्यात 'गाडी हळू चालवा' सांगणं पडलं महागात; भररस्त्यात दाम्पत्याला मारहाण, 3 वर्षांचा चिमुकलाही जखमी

डिजिटल पुणे    28-05-2026 17:56:59

पुणे : पुण्यात “गाडी हळू चालवा” असे सांगितल्याच्या कारणावरून एका दाम्पत्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत त्यांच्यासोबत असलेला 3 वर्षांचा लहान मुलगाही जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी संबंधित दाम्पत्य आपल्या 3 वर्षांच्या मुलासह वाघोलीतील डेकॅथलॉन येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी आटोपून ते दुचाकीवरून घरी परतत असताना सोयरीक गार्डनसमोरील चौकात यू-टर्न घेत असताना खराडीच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या वॅगनआर कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या घटनेनंतर दुचाकीस्वाराने “गाडी हळू चालवा” असे म्हटल्याने कारमधील चालक आणि सोबत असलेल्या व्यक्तीने शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर या दोघांनी संबंधित दाम्पत्याला मारहाण केली, अशी माहिती समोर आली आहे.या मारहाणीत लहान मुलगाही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती